बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारसह स्थानिक प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनाचे 1204 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर दिवसभरात 44 रूग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 14 जणांचा आज पुणे शहरात मृत्यू झाला आहे. कोरोनामुळं पुणे शहरात आतापर्यंत 2077 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात 1123 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत.
आज 1123 रुग्ण बरे झाले. पुण्यात आतापर्यंत एकूण 68,900 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी सोडण्यात आले आहेत.
एकूण पॉझिटिव्ह 85,700
आज 44 मृत्यू
एकूण मृत्यू 2077#COVID19 #Pune pic.twitter.com/pAFhqBRt0E— Smart Pune (@SmartPune) August 25, 2020
सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 85700 वर जावून पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 68900 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात 14723 रूग्ण हे अॅक्टीव्ह आहेत. एकूण अॅक्टीव्ह कोरोना रूग्णांपैकी 796 रूग्ण क्रिटिकल असून त्यापैकी 483 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमाचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.
आज दिवसभरात पुणे शहरात 1204 करोनाबाधित आढळले!
शहरातील उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 14 हजार 723 इतकी झाली आहे.
गंभीर रुग्ण 796
व्हेंटिलेटरवर 483#coronavirus #Pune #COVID19 pic.twitter.com/GR5SKTUozi— Smart Pune (@SmartPune) August 25, 2020