बहुजननामा ऑनलाइन टीम – शहरात गेल्या 24 तासात कोरोनामुळं 13 जणांचा मृत्यू (Coronavirus)झाला आहे. पुण्याबाहेरील 6 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या आता 4 हजार 556 झाली आहे. आज 293 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात कोरोनोच 302 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 74 हजार 754 वर जाऊन पोहचली आहे. आतापर्यंत सर्वात समाधानाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 65 हजार 246 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात कोरोनाचे 4 हजार 952 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. अॅक्टीव्ह असलेल्या एकुण रूग्णांपैकी 374 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 222 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.