नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत असल्याने केंद्र सरकारने एप्रिल महिन्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात केलीय. तर आता लसीकरणाबाबत दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलने एक सर्वेक्षण केलं आहे की, व्यक्तीचे लसीकरण झाले तरी कोरोना होऊन रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण एकंदर क्षुल्लक असल्याचे समोर आले आहे.
दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलतर्फे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ३ हजार २३५ इतक्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले गेले. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्या नंतर शंभर दिवसामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांची पाहणी करण्यात आलीय. त्या पाहणीवेळी जवळपास ८५ आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण कमी होते. यावेळी सर्वेक्षणात लसीकरण झालेल्यापैकी फक्त ०.०६ % इतक्या नागरिकांनाच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. मुख्यतः म्हणजे त्या बाधित ८५ पैकी ६५ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. तर बाकी २० जणांना लसीचा एकच डोस मिळाला होता. विशेष म्हणजे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या बाधितांमध्ये अधिक काही गुंतागुंत निर्माण झाली नाही. तसेच ते कर्मचारी लवकरच कोरोनापासून बरे होणार असल्याचे अभ्यासात समोर आले आहे.
या दरम्यान, सिरमची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींची मात्रा घेतलेल्यांचे सर्वेक्षण अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये ९७.३८ % नागरिकांचे लसीकरणामुळे कोरोनापासून रक्षण झाल्याचे समोर आले आहे. लसीकरण पूर्ण झाल्यानंतरही कोरोना होण्याचे प्रमाण शून्यावर येईल, असे नाही. तर अपोलो हॉस्पिटलतर्फे करण्यात आलेल्या पाहिणीदरम्यान एक महत्वाचा खुलासा म्हणजे कोरोना प्रतिबंधक लसी १०० % प्रतिकारशक्ती निर्माण करत नाही. लस घेतल्या नंतरही कोरोनाची लागण झाली तरी तेव्हा त्या व्यक्तीची अथवा रुग्णाची प्रकृती गंभीर बिघडण्याची शक्यता काहीच नाही. तसेच त्यांच्यात बळींचे प्रमाण देखील कमी होणार आहेत.