नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या वाढून 36 लाख 91 हजार 167 झाली आहे. मागील दिवसांच्या तुलनेत सोमवारी कोरोनाच्या कमी पॉझिटिव्ह केस आल्या आहेत. 24 तासात 69 हजार 921 नवे रूग्ण वाढले. एका दिवसात 819 लोकांचा मृत्यू झाला. संक्रमितांच्या आकड्यांमध्ये मागील सहा दिवसात आणि मृत्यूंच्या आकड्यांमध्ये मागील 28 दिवसात मोठी घसरण दिसत आहे. यापूर्वी 25 ऑगस्टला 66 हजार 873 केस आल्या होत्या, तर 3 ऑगस्टला 806 संक्रमितांचा मृत्यू झाला होता.
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार, देशात सध्या कोरोनाच्या 7 लाख 85 हजार 996 अॅक्टिव्ह केस आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 28 लाख 39 हजार 883 रूग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 65 हजार 288 लोकांचा या व्हायरसमुळे जीव गेला आहे. रिकव्हरी रेटमध्ये सुद्धा 1% ची वाढ झाली आहे, जो आता 76.85% वर पोहचला आहे. म्हणजे प्रत्येक 100 रूग्णांमध्ये 76 लोक बरे होत आहेत. तर, मरणार्यांचा आकडासुद्धा 65 हजारच्या पुढे गेला आहे.
Single-day spike of 69,921 new positive cases & 819 deaths reported in India, in the last 24 hours.#COVID19 case tally in the country stands at 36,91,167 including 7,85,996 active cases, 28,39,883 cured/discharged/migrated & 65,288 deaths: Health Ministry pic.twitter.com/uQYh0ViARW
— ANI (@ANI) September 1, 2020
या राज्यांमध्ये सर्वात जास्त अॅक्टिव्ह केस
देशात सर्वात जास्त अॅक्टिव्ह केस महाराष्ट्रात आहेत. येथे दिड लाखापेक्षा जास्त संक्रमित रूग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत. यानंतर दुसरा नंबर तमिळनाडु, तिसर्या नंबरवर दिल्ली, चौथ्या नंबरवर गुजरात आणि पाचव्या नंबरवर पश्चिम बंगाल आहे. या पाच राज्यात सर्वात जास्त अॅक्टिव्ह केस आहेत.
ऑगस्टमध्ये सर्वात जास्त मृत्यू
कोरोनाने सर्वात जास्त ऑगस्टच्या 31 दिवसात 28 हजार 887 लोकांचा बळी घेतला. यापूर्वी जुलैमध्ये 36 हजार 548 आणि जूनमध्ये 17 हजार 410 लोकांचा मृत्यू झाला होता. ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात 9 हजार 589 रूग्णांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रात 11 हजार 852 नवीन केस
महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाची 11 हजार 852 नवी प्रकरणे समोर आली. 11 हजार 158 रिकव्हरी आणि 184 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1 लाख 94 हजार 56 रूग्ण असे आहेत, ज्यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहे. आतापर्यंत 5 लाख 73 हजार 559 लोक बरे झाले आहेत, तर 24 हजार 583 लोकांचा मृत्यू झाला आहे.