बहुजननामा ऑनलाइन टीम – महाराष्ट्रात (Maharashtra) 24 तासात कोरोनाचे (COVID-19) 5,548 नवे पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 7,303 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय 74 लोक कोरोनामुळं दगावले आहेत. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं (State’s Public Health Department) याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील रिकव्हरी रेट (Recovery Rate) आता 89.99 टक्के एवढा झाला आहे. तर मृत्यूदर हा 2.62 टक्के एवढा आहे.
Maharashtra reports 5,548 new #COVID19 cases, 7,303 recoveries and 74 deaths, as per State Public Health Department.
COVID19 tally of the State rises to 16,78,406 including 15,10,353 recoveries and 43,911 deaths. Active cases at 1,23,585. pic.twitter.com/mchTiToSCY
— ANI (@ANI) October 31, 2020
राज्यात आतापर्यंत 16,78,406 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 15,10,353 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर 43,911 लोकांनी आपला जीव कोरोनामुळं गमावला आहे. सध्या राज्यात 1,23,585 एवढे कोरोनाचे अॅक्टीव्ह ( Active cases) रुग्ण आहेत.
आतापर्यंत झालेल्या 89,67,403 चाचण्यांपैकी 16,78,406 लोकांना (18.72 %) कोरनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सध्या 25,37,599 लोक हे होम क्वारंटाईन आहेत. 12,342 कोरोना सेंटरमध्ये दाखल आहेत.