पुणे : बहुजननामा ऑनलाइन – शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 366 नवे पॉझिटिव्ह आढळले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील तिघांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं 4 हजार 482 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 346 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्या पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 71 हजार 418 वर जावून पोहचली आहे. सर्वात समाधानाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 61 हजार 556 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्या पुण्यात कोरोनाचे 5 हजार 380 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अॅक्टीव्ह रूग्णांपैकी 429 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 254 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.