बहुजननामा ऑनलाइन टीम – शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 279 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून शहरातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 7 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं (Coronavirus)मृत्यू होणार्यांचा आकडा 4 हजार 522 वर गेला आहे. दिवसभरात 360 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्या पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 64 हजार 115 पर्यंत पोहचली आहे. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 55 हजार 225 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 4 हजार 522 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अॅक्टीव्ह रूग्णांपैकी 356 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 234 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येत आहे.