बहुजननामा ऑनलाइन टीम – पुणे शहरात गुरुवारी (दि.24) 278 नवीन कोरोनाबाधित(Coronavirus) रुग्णांची वाढ झाली आहे. तर 481 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्य प्रशासनावरील ताण कमी झाला आहे. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 3 हजार 109 संशयितांची स्वॅब तपासणी करण्यात आली.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 383 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. यापैकी 224 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर 159 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. शहरातील सक्रिय रुग्ण संख्या पाच हजाराच्या आत आली असून सध्या शहरात 4 हजार 668 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज दिवसभरात 6 रुग्णांचा मृत्यू झाला असून यामध्ये 2 रुग्ण पुणे शहराबाहेरील आहेत. शहरात आजपर्यंत 1 लाख 77 हजार 047 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 67 हजार 787 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळे पुणे शहरामध्ये 4 हजार 592 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने देली.
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 57 हजार 915 रुग्णांपैकी 3 लाख 41 हजार 298 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यात सध्या 7 हजार 974 ॲक्टीव रुग्ण आहे. आजपर्यंत 8 हजार 643 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.41 टक्के इतके आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.36 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.