बहुजननामा ऑनलाइन टीम –कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. स्थानिक प्रशासन देखील 24 तास कार्यरत आहे. दरम्यान, पुणे शहरात गेल्या 24 तासात तब्बल 1243 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात कोरोनाचे 1225 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर पुणे शहरातील 38 जणांचा आज मृत्यू झाला आहे. पुणे शहराबाहेरील 13 जणांचा देखील आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं 1988 जणांचा मृत्यू झाला आहे.
पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 83395 वर जावुन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 66589 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात सध्या 14818 रूग्ण हे अॅक्टीव्ह आहेत. एकुण अॅक्टीव्ह रूग्णांपैकी 803 जण हे क्रिटिकल असून त्यापैकी 493 जणांचा व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनानं नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नका. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्क परिधान करा तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करा असं आवाहन केलं आहे.
दिवसभरात नवे १,२२५ कोरोनाबाधित !
पुणे शहरात आज नव्याने १,२२५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ८३ हजार ३९५ इतकी झाली आहे.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 23, 2020