नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे या व्हायरसवरील लस शोधण्याचे काम जगभरातील शास्त्रज्ञ करत आहेत. काही लसींच्या मानवी चाचण्या सुरुही झाल्या आहेत. प्रत्येकच जण या लसीची वाट पाहत आहे. दरम्यान जगातील प्रासिध्द आरोग्य साप्ताहिक ‘द लॅसेन्ट’चे संपादक रिचर्ड हॉर्टन यांनी एक ट्विट केले असून त्याबाबत लोकांमध्ये चर्चा सुरु आहे.
त्यांनी रविवारी एक ट्विट केले होते ज्यात म्हटले होते की, उद्या कोविड-१९ लसीच्या परिणामांची घोषणा केली जाईल. रिचर्ड यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘उद्या. वॅक्सीन. फक्त सांगत आहे.’ त्यानंतर या ट्विटबाबत चर्चा सुरु झाली. या ट्विटची चर्चा सोशल मीडिया आणि जगातील इतर देशातही होत आहे.
Tomorrow. Vaccines. Just saying.
— richard horton (@richardhorton1) July 19, 2020
तसेच आज ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत तयार होत असलेल्या लसीबाबतही मोठी घोषणा होईल, असे म्हटले जात आहे. जागतिक आरोग्य संघटना जगातील १४० लसींचे निरीक्षण करत आहे. तर अनेक लसींची मानवी चाचणी सुरु आहे.
तर एकीकडे ब्राझीलमध्ये सुरु असलेल्या चिनी कंपनी सिनोवाक बायोटेकची चाचणी तिसऱ्या टप्प्यात जाण्यासाठी सज्ज आहे. भारतात देखील दोन लसींच्या मानवी चाचण्या सुरू आहेत