नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर सुद्धा अनेक लोकांना विविध प्रकारच्या समस्या होत आहेत. यास एक्यूट पोस्ट-कोविड सिंड्रोम सुद्धा म्हटले जाते. अनेक लोकांना आठवडे आणि महिन्यांपर्यंत तक्रारी असतात. कोरोना व्हायरसने तुमच्या शरीरावर किती अटॅक केला आहे यावर हे अवलंबून आहे. या समस्या सहा महिन्यापर्यंत राहू शकतात. अशावेळी काही समस्या जाणवत असतील तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. या समस्या कोणत्या ते जाणून घेवूया…
पोस्ट कोविड लक्षणे
कोरानातून बरे झाल्यानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी सुद्धा अनेक लोकांना त्रास होतो. यास पोस्ट कोविड लक्षणे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने हलका खोकला, डोकेदुखी आणि अंगदुखी, थकवा, श्वास घेण्यास त्रास, चव-वास जाणवत नाही अशा तक्रारी असतात. मोठ्या कालावधीपर्यंत आजारी राहिल्यास फुफ्फुसे, हृदय, किडनी किंवा मेंदूवर सुद्धा याचा परिणाम होतो.
1-खोकला, सर्दी –
अनेक लोकांना कोरोनातून बरे झाल्यानंतर सुद्धा अनेक महिने सर्दी आणि खोकला असतो. याकडे दुर्लक्ष करू नका.
2-डोकेदुखी आणि थकवा –
कोरानातून बरे झाल्यानंतर मोठ्या कालावधीपर्यंत थकवा जाणवतो. डॉक्टरांचा सल्ला घ्या.
3-श्वास घेण्यास त्रास –
कोरोनामध्ये ऑक्सीजन सेच्युरेशन कमी झाल्याने श्वास घेण्यास त्रास होतो. बरे झाल्यानंतर ही समस्या बंद होते परंतु काही लोकांमध्ये अनेक आठवडे राहू शकते. व्हायरसने फुफ्फुसांवर हल्ला केलेला असल्याने बरे झाल्यानंतर सुद्धा त्रास जाणवतो. यासाठी ब्रिथिंग एक्सरसाईज करा.
4- तणाव आणि झोप न येणे –
कोरोनाचे काही रूग्ण तणाव आणि झोप न येण्याच्या समस्येला तोंड देत आहेत. भीतीमुळे लोकांना झोप लागत नाही, ही समस्या बरे झाल्यानंतर सुद्धा जाणवते. परंतु झोप जास्त घेतली तर लवकर रिकव्हर होऊ शकता. चांगल्या झोपेसाठी योगा करा.
5- पायांमध्ये सूज –
कोरोनातून बरे झाल्यानंतर काही लोकांना पायांमध्ये सूजची समस्या होते. पायांमध्ये सूज, टाचांवर सूज, हार्ट रेट वाढणे, कमजोरी जाणवत आहे. तसचे शरीरात ब्लड क्लॉटिंगची समस्या सुद्धा वाढत आहे. यासाठी व्हिटॅमिन युक्त पदार्थ सेवन करा. जास्त त्रास झाल्यास डॉक्टरांकडे जा.