नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेने देशभरात हाहाकार उडाला आहे. ही स्थिती पाहता जवळपास सर्व बँकांनी आपल्या ग्राहकांना ऑनलाईन सर्व्हिसची सुविधा दिली आहे, जेणेकरून त्यांना ब्रँचमध्ये जावे लागू नये. तर, लॉकडाउन सारख्या प्रतिबंधांमध्ये वर्दळसुद्धा कमी आहे. तरीसुद्धा काही महत्वाच्या कामासाठी बँकेत जायचे असेल तर कोणत्या दिवशी बँक उघडी आहे, हे जाणून घ्या. जूनमध्ये बँका 9 दिवस बंद राहणार आहेत.
राज्यांच्या हिशेबाने ठरतात सुट्ट्या
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कडून बँकांच्या सुट्टीची लिस्ट जारी केली जाते. यामध्ये राज्यांच्या हिशेबाने सर्व बँकांच्या सुट्ट्या ठरलेल्या असतात. या लिस्टनुसार, साप्ताहिक सुट्ट्या आणि हॉलिडे मिळून जूनच्या महिन्यात एकुण 9 दिवस बँका बंद राहतील. जून महिन्यात यावेळी कोणताही मोठा सण नाही, यासाठी साप्ताहिक सुट्ट्यांशिवाय केवळ 3 स्थानिक सण आहेत, ज्यादिवशी बँका बंद राहतील.
कोण-कोणत्या दिवशी बंद राहतील बँका
6 जून- रविवार
12 जून- दूसरा शनिवार
13 जून- रविवार
15 जून- मिथुन संक्रांती आणि रज पर्व (इजवाल-मिजोरम, भुवनेश्वरमध्ये बँका बंद)
20 जून- रविवार
25 जून- गुरु हरगोविंदजी जयंती (जम्मू आणि श्रीनगरच्या बँक बंद)
26 जून- दूसरा शनिवार
27 जून- रविवार
30 जून- रेमना नी (केवळ इजवालमध्ये बँका बंद राहतील)