मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) पदाची सुत्रे हाती घेताच ठाकरे सरकारने (Thackeray Government) घेतलेले निर्णय बदलण्यास सुरुवात केली आहे. शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्का देत सरकार स्थापन केले. त्यानंतर आता एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाकरे सरकारने केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती (Officer Transfer) देत उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
29 जूनला ठाकरे सरकारने अखेरच्या कॅबिनेट बैठकीत (Cabinet Meeting) अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
यामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यांना स्थगिती देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे (Aurangabad) नाव संभाजीनगर (Sambhajinagar) करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता.
यानंतर औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे (Aurangabad Municipal Commissioner Astik Kumar Pande) यांची बदली करण्यात आली होती.
सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी (Sangli District Collector Abhijit Chaudhary) यांची औरंगाबादच्या महापालिका आयुक्तपदावर नियुक्ती केली होती.
तर पांडे यांना औरंगाबाद सिडकोचे मुख्य प्रशासकपद (Chief Administrator of Aurangabad CIDCO) देण्यात आले होते.
तसेच दिपा मुधोळ मुंडे (Deepa Mudhol Munde) यांना सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नियुक्त केले होते.
यावर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सरकारने स्थगिती दिली आहे.
यामुळे पुढील आदेश निघेपर्यंत आस्तिक कुमार पांडे औरंगाबादचे आयुक्त राहणार आहेत.
तर अभिजित चौधरी यांना सांगलीला जावे लागेल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde gave order to stop transfer of officers of aurangabad astik kumar pande sangalis abhijeet chaudhari
हे देखील वाचा :