नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वर्षाला कोट्यावधी रूपये मिळवणाऱ्यावर कँटिनमधून सॅन्डविच चोरी केल्याचा आरोप असल्याने त्याला नोकरीवरून काढण्यात आले आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार बँकिंग कंपनी सिटीग्रुपने लंडनच्या मुख्यालयात काम करणाऱ्या बॉंड व्यापारी पारस शहा यांच्याविरुद्ध कारवाई केली असून त्यांनी मात्र या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. पारस याअगोदर एचएसबीसी येथे काम करत होता. पुढे २०१७ मध्ये त्याने सिटी ग्रुप जॉईन केला होता.
पण कँटिनमधून अनेक वेळा अन्न चोरून नेले आहे, हे उघड झालेले नाही. दरम्यान पारसच्या दोन माजी सहकाऱ्यांनी पारस एक यशस्वी व्यापारी म्हणून ओळखला जात होता आणि त्याला खूप पसंती होती, असे सांगितले. त्याचा वर्षाचा पगार ९ कोटी रु. किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो, अशी माहिती मिळत आहे.
जेव्हा काही दिवसांनी कंपनी वरिष्ठ कर्मचाऱ्यांना बोनस देणार आहेत त्यावेळी शाह यांना निलंबित केले जाणार आहे. इंग्लंडमध्ये काही काळ बँकिंग नियामक नियमांचे काटेकोरपणे पालन करवून घेतले जात आहे.