नवी दिल्ली : वृत्त संस्था – चीनी सैन्याने उत्तर आघाडीवर आक्रमता दर्शवल्याच्या एका वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर पीपल्स लिबरेशन आता पूर्व लडाख सेक्टरजवळ सराव करत आहे. भारतीय सशस्त्र दल सुद्धा कोरोना महामारी असूनही पूर्णपणे सतर्क आहे आणि चीनी सैन्याच्या या हालचालीवर बारीक नजर ठेवून आहे. चीनी अनेक वर्षांपासून या प्रदेशांमध्ये येत आहेत जिथे ते उन्हाळ्यात सराव करतात.
सूत्रांनुसार, मागच्या वर्षी सुद्धा चीनी सैन्य सरावाच्या आडून या प्रदेशांमध्ये आले होते आणि येथून पूर्व लडाखकडे आक्रमक प्रकारे गेले होते. त्यांनी म्हटले की, चीनी सैनिक आपल्या पारंपारिक क्षेत्रांमध्ये आहेत आणि काही ठिकाणी 100 किलोमीटर अंतरावर आणि त्यापेक्षा पुढे आहेत.
भारतीय लष्कराने घेतला सुरक्षा स्थितीचा आढावा
भारताने पूर्व लडाख आणि इतर सेक्टरमध्ये फॉरवर्ड परिसरांमध्ये उन्हाळ्यात सैनिकांच्या हालचाली पहिल्या. यानंतर, आघाडीवर तैनात सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सुद्धा नुकतेच प्रमुख परिसरात सुरक्षा स्थितीचा आढावा धेतला आणि स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. लडाखमध्ये भारतीय लष्कराकडून तैनात दलांमध्ये भारत-तिबेट सीमा पोलीस, भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्कर यांचा समावेश आहे, जे आता सेक्टरमध्ये सर्वात पुढे आहेत. चीनी आपल्या पारंपारिक सराव क्षेत्रातून हटल्यानंतर पूर्व आघाडीवर आले होते आणि तेव्हापासून दोन्ही बाजूंमध्ये सैन्य विवाद सुरू आहे.
भारतीय लष्कराकडून अतिरक्त बळ तैनात करण्याची सुरूवात
सूत्रांचे म्हणणे आहे की, आशा होती की चीनी आपल्या मुळ ठिकाणांवर परत जातील, परंतु ते फॉरवर्ड परिसरात थांबलेले आहेत. ते आपल्या क्षेत्रात बंकर्स निर्माण करताना दिसले आहेत आणि आपला संरचना मजबूत करण्याचे काम करत आहेत. तर, दुसरीकडे भारताने सुद्धा आपली स्थिती मजबूत केली आहे आणि आपल्या सैनिकांना मोठ्या हालचालीसाठी तयार केले आहे. अतिरिक्त दल तैनात करणे आणि रोटेशन सुद्धा जारी आहे. भारतीय आणि चीनी, दोन्ही लष्करांकडे मागील वर्षापासून सीमेवर मोठ्याप्रमाणात सैनिक तैनात आहेत.