पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Chinchwad Bypoll Election | चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक (Chinchwad Bypoll Election) होत आहे. यासाठी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) नाना काटे (Nana Kate) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राहुल कलाटे (Rebel Candidate Rahul Kalate) यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि ठाकरे गटाचे नेते प्रयत्न करत आहेत. आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून राहुल कलाटे याचे मन वळवण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर (MLA Sachin Ahir) चिंचवडमध्ये दाखल झाले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राहुल कलाटे आणि सचिन अहिर यांची आज भेट झाली. या भेटीत राहुल कलाटे यांनी उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आली. या भेटीनंतर सचिन अहिर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party Chief Uddhav Thackeray) यांचा निरोप घेऊन मी राहुल कलाटे यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. राहुल कलाटे यांनी निवडणुकीत माघार घ्यावी, भविष्यात महाविकास आघाडीकडून त्यांना राजकीय मदत केली जाईल, उद्धव ठाकरेंचा हा निरोप आम्ही त्यांना दिला आहे. (Chinchwad Bypoll Election)
तसेच राहुल कलाटे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे.
उद्धव ठाकरे यांनी राहुल कलाटे यांना निवडणुकीतून माघार घेण्याची विनंती केली आहे.
मात्र, यासंदर्भात स्वत: राहुल कलाटे हेच निर्णय जाहीर करीतल, असे सचिन अहीर यांनी सांगितले.
त्यामुळे राहुल कलाटे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Title :- Chinchwad Bypoll Election | sachin ahir meeting with rahul kalate regarding pimpari chinchwad by election
हे देखील वाचा :
Disha Patani | ‘त्या’ ड्रेसमुळे अभिनेत्री दिशा पटानीला करावा लागला ट्रोलिंगचा सामना; व्हिडिओ व्हायरल