बहुजननामा ऑनलाईन – चीनने कोविड-19 शी लढण्यासाठी आपल्या पहिल्या ’नेजल स्प्रे वॅक्सीन’च्या ट्रायलला मंजूरी दिली आहे. या वॅक्सीनच्या पहिल्या टप्प्याची ट्रायल नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. ही क्लिनिकल ट्रायल शंभर लोकांवर करण्यात येईल. चीनमधून पसरलेल्या या जागतिक महामारीने आतापर्यंत जगभरात नऊ लाखांपेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला आहे. चीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सनुसार ही पहिली वॅक्सीन आहे, जिला नॅशनल मेडिकल प्रॉडक्ट्स अॅडमिनिस्ट्रेशनकडून मंजूरी मिळाली आहे.
दुहेरी सुरक्षेचा दावा
हाँगकाँग युनिव्हर्सिटी आणि बिजिंगयेथील वानतायी बायोलॉजिकल फार्मसीच्या संशोधकांनी ही लस विकसित केली आहे. हाँगकाँग युनिव्हर्सिटीचे मायक्रोबायोलॉजिस्ट युवेन क्योंग व्योंग यांनी सांगितले की, नाकातून देण्यात येणार्या या वॅक्सीनद्वारे दुहेरी सुरक्षा मिळते. ही एन1एच1 सारख्या फ्लूसह कोरोना व्हायरसला सुद्धा निष्क्रिय करते. त्यांनी हे सुद्धा मान्य केले की, या वॅक्सीनचे साईड इफेक्ट म्हणून दमा आणि धाप लागण्याची समस्या होऊ शकते.
लाखो चाचण्या करण्याची गरज
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांचे म्हणणे आहे की, ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि औषध कंपनी ऐस्ट्राजेनेकाद्वारे विकसित कोरोना वॅक्सीनची चाचणी थांबल्याने एजन्सीला जास्त चिंता नाही. ऑक्सफोर्ड वॅक्सीनच्या चाचणीत आलेल्या अडथळ्याने जगाला हे समजण्याची संधी दिली आहे की, संशोधनात चढ-उतार येत असतात. लस लोकांना रोगापासून वाचवण्यात सक्षम आहे किंवा नाही यासाठी लाखो चाचण्या करण्याची गरज आहे.
मांजरींमध्ये सुद्धा कोरोनाचा धोका
दरम्यान, चीनी शास्त्रज्ञांना आपल्या संशोधनात आढळले आहे की, मांजरींमध्ये सुद्धा कोरोनाचा धोका असून शकतो. त्यांच्यामध्ये संसर्गाचा दर मागील अंदाजापेक्षा जास्त आढला आहे. चीनच्या हुआझोंग अॅग्रीकल्चरल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 102 मांजरींच्या रक्ताचे नमूण्यांचे विश्लेषण केल्यानंतर हा दावा केला आहे. 15 मांजरींच्या रक्ताच्या नमूण्यात कोरोना अँटीबॉडी आढळली.