नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जगात विविध टप्प्यात कोरोना लसची चाचणी घेतली जातेय. अनेक स्वयंसेवक त्यासाठी जीव धोक्यात घालून लस टोचून घेताहेत. पण, प्रत्यक्ष लसीकरण सुरू झालं तरी, लहान मुलांना ही कोरोना लस देता येणार नाही, असे नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केलंय.
जागतिक आरोग्य संघटनेने ऑक्टोबरमध्ये स्पष्ट केले आहे, त्यानुसार, जगात जवळपास 40 कोरोना लस कुठल्या न कुठल्या टप्प्यात चाचणीत आहेत. त्यातील 10 लस जवळपास शेवटच्या टप्प्यात पोहचल्या आहेत. हा चाचणीचा अंतिम टप्पा लस किती सुरक्षित आहे, हे दाखवून देतोय. पण, यातल्या कुठल्याही लस निर्मात्यांनी लहान मुलांवर आणि गर्भवती स्त्रियांवर याची चाचणी केलेली नाही. त्यामुळे हे दोन गट सोडून कोरोनाचं लसीकरण होणार.
डिसेंबरच्या सुरवातीला रशियाच्या Sputnik लशीची दुसरी मानवी चाचणी पुण्यात घेतली आहे. ही लस रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने तयार केली असली तरी या लसीचं भारतातलं उत्पादन डॉ. रेड्डीज प्रयोगशाळेमध्ये होतंय. या प्रयोगशाळेचं मुख्यालय हैदराबाद इथे आहे.
अमेरिकेच्या मॉडर्ना लसीबाबत ही तिसर्या टप्प्यामध्ये 94.5 टक्के यशस्वी ठरल्याचा दावा कंपनीने केलाय. नॅशनल इन्स्टयुट ऑफ एलर्जी एन्ड इंन्फेक्शिअस डिसीजच्या संशोधकांच्या दाव्यानुसार ही लस टोचून घेतल्यानंतर किमान 3 महिने तरी मानवी शरीरात अॅन्टीबॉडीज निर्माण करते.