छत्रपती संभाजीनगर : बहुजननामा ऑनलाईन – Chhatrapati Sambhajinagar Crime News | लहान मुलांमध्ये खेळण्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. दशरथ अंबादास रोकडे (वय 40 रा. मोतीवाला कॉलनी) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हि धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर दशरथ यांचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी आम्ही लवकरच या प्रकरणात गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. (Chhatrapati Sambhajinagar Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय आहे नेमके प्रकरण?
यामध्ये लहान मुलांमध्ये खेळण्यावरून भांडण झाले. यानंतर या भांडणावरून मोठ्या लोकांमध्ये भांडण झाले. आपल्या बहिणीशी भांडणाऱ्या शेजारच्या महिलेला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या दशरथ रोकडे यांना संबंधित महिलेनी आणि इतर तरुणांनी बेदम मारहाण केली. हि मारहाण एवढी भयंकर होती कि दशरथ बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी चिकलठाणा येथील मिनी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. (Chhatrapati Sambhajinagar Crime News)
दशरथ यांच्या घराशेजारी त्यांची बहीण उषा हातागळे या राहतात. रविवारी उषा यांच्या मुलांशी शेजारच्या महिलेच्या मुलांचे भांडण झाले. यावरून मोठ्यामध्ये वाद झाला. यावरून दशरथ यांची बहीण उषा हातागळे आणि शेजारच्या महिलेचे जोरदार भांडण झाले. यानंतर हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या दशरथ यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे ते बेशुद्ध झाले. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Web Title :- Chhatrapati Sambhajinagar Crime News | one died in a stampede in chhatrapati sambhajinagar
हे देखील वाचा :
PMPML Strike | पीएमपीएमएलची सेवा पूर्ववत करावी, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी
Nashik ACB Trap | 7/12 उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यासाठी लाचेची मागणी, तलाठी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात