बहुजननामा ऑनलाईन
आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी यानं चीनच्या कंपनीसोबत करार केल्याचं दिसत आहे. आयपीएल सुरू होण्यापर्वीच काही दिवसांपूर्वीच ओपो या चीनच्या कंपनीनं धोनीसोबतचे काही व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केले आहेत. यामुळं आता धोनी चांगलाच ट्रोल होत आहे. सध्याच्या घडीला भारत आणि चीन यांच्यातील तणावपूर्ण वातावरणानंतर धोनी या कंपनीशी कसा काय करार करू शकतो असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याबाबत धोनीनं मात्र काहीही भाष्य केलेलं नाही.
He is making a comeback, to #BeTheInfinite and to make you a part of his journey. Do you know who we are talking about? Tell us in the comments and stand a chance to win a new OPPO Reno4 Pro edition! pic.twitter.com/axXLnjqCqA
— OPPO India (@OPPOIndia) September 15, 2020
ओपो या कंपनीनं काही व्हिडीओ ओपो इंडिया या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या व्हिडीओंमध्ये धोनी दिसत आहे. करार झाल्याशिवाय कोणताही क्रिकेटपटू कंपनीच्या व्हिडीओत दिसत नाही. त्यामुळं धोनी आणि कंपनीचा करार झाला असेल. या कंपनीनं आयपीएलचं औचित्य साधून धोनीचे काही व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केले आहेत.
https://twitter.com/oppomobileindia/status/1306450305786277890?s=20
धोनीचं देशावर किती प्रेम आहे हे सर्वांनाच माहित आहे. धोनी हा भारतीय आर्मीसोबत जम्मू आणि काश्मीरमध्ये सरावाला गेला होता. भारतीय वायुदलानं धोनीला लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवीही दिली आहे. धोनी हा वायु दलातील पॅरा रेजिमेंट दलाच्या सरावात सहभागी होत असतो.
The man we’ve missed on the cricket field, the Captain Extraordinaire MS Dhoni is here to inspire us to fight all hindrances, get back on our feet and #BeTheInfinite with the new #OPPOReno4Pro. Get ready for the release of this emotional ride on 24th September! pic.twitter.com/TgQ97MpuoY
— OPPO India (@OPPOIndia) September 17, 2020
Game on because #SachinIsBack
We are glad to welcome Nation’s biggest Cricket Icon @sachin_rt as our Brand Ambassador.
Let’s up the ante & take fantasy gaming to the next level! pic.twitter.com/nRWmq5q9zK— First Games (@FirstGamesIN) September 15, 2020