पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Attack) यांच्यावर पिंपरी चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली. ते एका कार्यक्रमातून निघत असताना अचानक त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. त्यांच्यावर शाई फेकणाऱ्या इसमाला आणि त्याच्या अन्य साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अद्याप कोणीही या शाईफेकीची (Chandrakant Patil Attack) जबाबदारी घेतलेली नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
#Chandrakant_Patil | पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक@Policenama1 #policenama @BJP4Maharashtra @ChDadaPatil pic.twitter.com/xT9nwCsMEa
— Policenama (@Policenama1) December 10, 2022
शाळा किंवा महाविद्यालये सुरू करण्यासाठी सरकारवर अवलंबून का राहता? महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक शाळा आणि महाविद्यालये सुरू केली. त्यावेळी त्यांना सरकारने अनुदान दिले नाही. त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या आणि चालविल्या, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावरून राज्यात वादंग उठले आहे. शनिवारी त्याच रागातून पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमातून बाहेर पडत असताना चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली.
Web Title :- Chandrakant Patil | ink throw on chandrakant patil at pimpri chinchwad
हे देखील वाचा :
Malaika Arora | मलायका अरोराचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत; स्टँडअप कॉमेडी करत दिले ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
Pune Lonavala Local | कामशेत स्थानकाच्या कामामुळे पुणे लोणावळा मार्गावरील अनेक लोकल रद्द