पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोथरूड (Kothrud) भागात घराजवळ असलेल्या मेडिकल दुकानात औषध आण्यास जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 50 हजार रुपयांचे मंगळसूत्र (Mangalsutra of 50 thousand rupees) जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. सव्वा आठ वाजता ही घटना घडली आहे.
याप्रकरणी 23 वर्षीय महिलेने कोथरूड (Kothrud) पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद या परमहंसनगर भागात राहतात.
त्या गुरूवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घराशेजारी असणाऱ्या मेडिकलमध्ये औषध असण्यास जात होत्या.
त्या पायी चालत जात असताना पाठीमागून दुचाकीवर एकजण त्यांच्याजवळ आला.
त्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील 50 हजार रुपयांचे मंगळसूत्र (Mangalsutra of 50 thousand rupees) जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले.
त्यांनी आरडाओरडा केला.
मात्र चोरटा पसार होण्यात यशस्वी झाला आहे.
अधिक तपास कोथरूड (Kothrud) पोलीस करत आहेत.
कृपया हे देखील वाचा:
Gautam Adani Earning | ‘बुलेट’च्या स्पीडनं संपत्तीत वाढ ! गौतम अदानी यांनी यावर्षी दररोज कमावले 2000 कोटी रुपये, ‘या’ कंपन्यांमुळे मोठी कमाई
दुर्दैवी ! शेतात बैलगाडी उलटल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू, लातूर जिल्ह्यातील घटना
…म्हणून शरद पवार यांनी केलं शिवसेनेचं कौतुक
आता एजंटची अजिबात गरज नाही, एका क्लिकवर जाणून घ्या PF संबंधिची महत्वाची माहिती