लातूर : बहुजननामा ऑनलाईन – शेतात बैलगाडी Bullock Cart उलटल्याने एका शाळकरी मुलाचा schoolboy दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लातूर Latur जिल्ह्यातील जानवळ (ता. चाकूर) शिवारात बुधवारी (दि. 9) दुपारी 12 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेने जानवळ Janwal परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
शंतनू रामदास जानवळकर (11 रा. जानवळ, ता. चाकूर ) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, कोरोनाने Corona सर्वत्र हाहाकार माजवला आहे.
त्यामुळे सध्या शाळा School बंद असल्याने शंतनू हा सध्या वडीलांसोबत नेहमी शेताला जात होता.
शंतनू हा नेहमीप्रमाणे बुधवारी दुपारी बैलगाडीत बसून वडिलासोबत शेतात गेला होता.
पावसाळा सुरु झाल्याने शेतात Farm ठेवलेली सोयाबीनची Soybean गुळी बैलगाडीत भरून दोघे बापलेक घराकडे निघाले होते.
दरम्यान शेताजवळच एका ठिकाणी बैलगाडी अचानक उलटली. या अपघातात Accident शंतनूच्या डोक्याला जबर मार लागला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कृपया हे देखील वाचा:
आता एजंटची अजिबात गरज नाही, एका क्लिकवर जाणून घ्या PF संबंधिची महत्वाची माहिती
आता एजंटची अजिबात गरज नाही, एका क्लिकवर जाणून घ्या PF संबंधिची महत्वाची माहिती