नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य रेल्वेमध्ये अनेक पदांवर भरती होणार आहेत. २५६२ अॅप्रेंटिस पोस्टसाठी अर्ज आमंत्रित आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार २२ जानेवारी २०२० रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. उमेदवारासाठी आवश्यक असलेली पात्रता दहावी पास विहित केलेली आहे.
महत्त्वाच्या तारखा:
मध्य रेल्वे भरती २०२० ऑनलाईन अर्ज करण्याची प्रारंभ तारीख: २३ डिसेंबर २०१९
मध्य रेल्वे भरती २०२०ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २२ जानेवारी २०२०
शैक्षणिक पात्रता:
संबंधित विषयातील मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान ५०% गुणांसह १० वी पास किंवा समकक्ष संबंधित विषयातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्रधारक अर्ज करू शकतात.
मध्य रेल्वे भरती २०२० वय मर्यादा:
१५ ते २४ वर्षे वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
उमेदवाराची निवड कशी होईल?
अॅप्रेंटिस पदासाठी उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.
अर्ज कसा भरावा:
इच्छुक उमेदवार मध्य रेल्वे भर्ती २०२० साठी ऑनलाईन मोडवर किंवा २२ जानेवारी २०२० पूर्वी अर्ज करू शकतात.