नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर)सह मिळून शाळकरी विद्यार्थ्यांसाठी एका शानदार उपक्रमाला सुरुवात केली आहे. सीबीएसईने विद्यार्थ्यांसाठी इनोव्हेशन अवॉर्ड स्पर्धा सुरू केली आहे.
या अंतर्गत आयोजित स्पर्धेत विजेता ठरणार्या विद्यार्थ्याला एक लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान केला जाईल. सामाजिक समस्यांना सर्वात वेगळ्या पद्धतीने प्रदर्शित करणार्या प्रमुख 15 विद्यार्थ्यांना विशेष प्रकारे 10 हजार रुपयांपासून 50 हजार रुपयांपर्यंत कॅश प्राईजने सन्मानित केले जाईल.
सीबीएसई बोर्डाने विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी एका स्पर्धेची घोषणा केली आहे. या उपक्रमाची सुरुवात कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ( सीएसआयआर) ने शाळकरी मुलांमध्ये संशोधन आणि विज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी केली आहे. याचे नाव ‘इनोव्हेशन अवॉर्ड फॉर स्कूल चिल्ड्रेन’ ठेवण्यात आले आहे. विद्यार्थी अधिक माहितीसाठी सीबीएसईच्या अकॅडमिक वेबसाइट ललीशरलरवशाळल.पळल.ळप ला व्हिजिट करू शकतात.
30 एप्रिल 2021 पर्यंत करू शकता रजिस्ट्रेशन
याबाबत सीबीएसईकडून सर्व संबंधीत शाळांना एक अधिकृत अधिसूचना सर्क्युलर आणि पत्र सुद्धा जारी करण्यात आले आहे. शाळांना पाठवण्यात आलेल्या पत्रात या स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. स्पर्धेत केवळ 18 वर्षापेक्षा कमी वयाचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. वयाची गणना 1 जानेवारी 2021 च्या आधारावर केली जाईल. निर्देशात म्हटले आहे की, या स्पर्धेत सहभागी होणारे इच्छुक आणि पात्र विद्यार्थी 30 एप्रिल 2021 पर्यंत रजिस्ट्रेशन करू शकतात. नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना आपली एंट्री शाळ व्यवस्थापनाद्वारे सत्यापित पत्रासह पुढे दिलेल्या पत्त्यावर पाठवावी लागेल –
प्रमुख,
सीएसआयआर – इनोव्हेशन प्रोटेक्शन यूनिट,
विज्ञान सूचना भवन, 14 – सत्संग विहार मार्ग,
स्पेशल इन्स्टीट्यूशनल एरिया,
नवी दिल्ली – 110067
इतकी आहे पुरस्काराची रक्कम
प्रथम पुरस्कार : एक लाख रुपये (1 अवॉर्ड)
द्वितीय पुरस्कार : 50 हजार रुपये (2 अवॉर्ड)
तृतीय पुरस्कार : 30 हजार रुपये (3 अवॉर्ड)
चतुर्थ पुरस्कार : 20 हजार रुपये (4 अवॉर्ड)
पाचवा पुरस्कार : 10 हजार रुपये (5 अवॉर्ड)
सोबतच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विज्ञान विषयाच्या शिक्षकांसह आयपीआरमध्ये ट्रेनिंग दिले जाईल. अधिक माहितीसाठी लीळी.ीशी.ळप वर व्हिजिट करू शकता.