बहुजननामा ऑनलाईन
कर्जात बुडालेली देशाची सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने आपल्या कर्मचार्यांच्या प्रॉव्हिडंट फंड (ईपीएफ) व टीडीएस सारख्या कायदेशीर पेमेंटचे लागोपाठ डिफॉल्ट करत आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये या प्रकरणाशी संबंधीत लोकांच्या संदर्भाने ही बाब समोर आली आहे. एअर इंडियाकडून अशाप्रकारच्या पेमेंटमध्ये डिफॉल्टचे प्रकरण अशावेळी समोर आले आहे, जेव्हा केंद्र सरकार एअर इंडियाची भागीदारी विकण्याच्या प्रयत्नात आहे.
मात्र, विमान कंपनीने टीडीएस पेमेंटसह कोणत्याही थकबाकीचा इन्कार केला आहे. पीएम पेमेंटबाबत सुद्धा अजून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. बिझनेस वृत्तपत्र इकॉनॉमिक टाइम्सने आपल्या एका रिपोर्टमध्ये एयर इंडियाच्या संदर्भाने लिहिले आहे की, कंपनीने टीडीएसचे थकीत पैसे भरले आहेत. फॉर्म 16 वाटण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जानेवारी 2020 पासून थकीत पेमेंट
याच रिपोर्टमध्ये सरकारी अधिकार्यांच्या संदर्भाने लिहिले आहे की, एअर इंडियाने या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत टीडीएस आणि पीएफचे पेमेंट केलेले नाही. मार्च अखेरपर्यंत एकुण थकीत टीडीएस सुमारे 26 कोटी रूपये आहे. अशाच प्रकारे पीएफ पेमेंट सुद्धा कोट्यवधी रूपयांत आहे. या सरकारी विमान कंपनीच्या प्रवक्त्याने या प्रकरणाची कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.