नवी दिल्ली वृत्तसंस्था : असं म्हणतात ना, ‘देणारा देतो ते छप्पर फाडून देतो.’ हि प्रचलित म्हण कॅनडात राहणाऱ्या विकी मशेल यांना तंतोतंत लागू झाली आहे. विकी यांनी १३१ रुपयांचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. ज्यातून त्यांना तब्बल ३१ कोटी रुपयांची लॉटरी आहे.
४२ वर्षीय विकी ह्या एका अकांउंटन्सी फर्म मध्ये सहायक म्हणून कार्यरत असून त्या दोन मुलांच्या आई आहेत. ज्यावेळी त्यांनी हे १३१ रुपयांचे तिकीट खरेदी केले, त्यावेळी त्यांच्या खात्यात केवळ १३१ रुपयेच होते आणि त्याच पैशानी त्यांचे नशीब उघडले. विकी बोलताना म्हणाल्या कि, ‘मी या आधी देखील लॉटरीचे तिकीट खरेदी केले आहेत. त्यात मी सर्वात जास्त म्हणजे ८७८ रुपये जिंकले होते.
मात्र या नंतर ३६ लाख पाउंड म्हणजेच ३१ कोटी ५५ लाख इतकी रक्कम जिंकले. मला जेव्हा लॉटरीचा मेल मिळाला तेव्हा मला वाटले कि काही तरी छोटी रक्कम असेल परंतु जेव्हा लॉटरी चा आकडा पहिला, मला आश्चर्याचा धक्काच बसला ‘ या जिंकलेल्या रकमेमुळे त्यांना दरमहा ८ लाख ८० हजार एवढे रुपये मिळणार आहेत. दरम्यान , ‘या लॉटरी मुले मी माझ्या सगळ्या गरज पूर्ण करणार आहे. छोट्या घरात राहणारी मी आता मोठ्या घरात राहणार आहे.’ असेही विकी म्हणाल्या.