बहुजननामा ऑनलाईन टीम : तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर, ही सुवर्णसंधी आहे. कारण पदवी प्राप्त केलेल्यांसाठी कॅबिनेट सचिवालयात फिल्ड कार्यालयात २९ पदांची भरती करण्यात येणार आहे. डेप्युटी फिल्ड ऑफिसर्सच्या पदासाठी हि भरती सुरु आहे. त्यासाठी १२ नोव्हेंबर २०१९ ही तारीख अर्जासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जाणून घ्या प्रक्रिया,
पद आणि वेतन :
फिल्ड ऑफिसर २९ पद
४४,९०० रुपये , स्तर -७
यासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठांची पदवी आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे या अर्जासाठी जनरल, ओबीसी, महिला , एससी , एसटी, पीडब्ल्यूडी साठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही.
त्याचप्रमाणे नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली असून, इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पात्रतेनुसार योग्यता,अनुभव , इत्यादी माहिती तसेच फोटो कॉपीसह पोस्ट बॅग नंबर ००१, लोधी रोड पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली, ११०००३ या पत्त्यावर १२ -११-२०१९ पर्यंत पाठवणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड लेखी परीक्षा, संगणक चाचणी परीक्षा (सीडीपी ) आणि शेवटी मुलाखत अश्या पद्धतीने केली जाईल. यासंदर्भात http://davp.niv.in/ या सांकेतिक स्थळावर भेट देऊन आपण अधिक माहिती मिळवू शकता.
Visit : bahujannama.com