Bullock Cart Race | बैलगाडा शर्यतीच्या श्रेयवादावरून खासदार अमोल कोल्हे आणि आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांमध्ये स्टेटस वॉर
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – BullockCart Race| सुप्रिम कोर्टाने आज बैलगाडा शर्यतीचा महत्त्वपूर्ण असा निर्णय दिला. सुप्रिम कोर्टाने काही अटी ठेवत बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्याने महाराष्ट्रभरात जल्लोषपूर्ण वातावरण आहे. (BullockCart Race) राजकीय वर्तुळात मात्र श्रेयवादावरून वातावरण तापले आहे. बैलगाडा शर्यतीबाबत (BullockCart Race) पुणे जिल्हातील शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) यांनी संसदेत तर भाजप (BJP) आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांनी राज्यात आवाज उठवला. आता निर्णयानंतर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये श्रेयवादावरून स्टेटस वॉर (Status War) बघायला मिळत आहे.
खा. डॉ. अमोल कोल्हेंच्या समर्थकांनी “आपल्या फकड्याने करून दाखवलं” असे व्हॉट्सअॅप (Whatsapp) स्टेटस
ठेवून आमदार महेश लांडगेंच्या समर्थकांना डिवचले आहे. तर, आ. महेश लांडगेंच्या समर्थकांनी
“पैलवानाने करून दाखवले” असे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले असून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
दोन्ही समर्थकांमध्ये स्टेटस वॉर रंगल्याचे चित्र आहे.
बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्रात (Maharashtra) मानाची मानली जाते. अनेक गावांचे अर्थकारण बैलगाडा शर्यतीभोवती
फिरते. यामुळे आमदार महेश लांडगे यांनी वेळोवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(DCM Devendra Fadnavis) यांच्या आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या
(All India Bullock Cart Association) माध्यमातून न्यायालयात पाठपुरावा केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तसेच, खासदार अमोल कोल्हे यांनी देखील बैलगाडा शर्यतीबाबत संसदेत (Parliament) आवाज उठवण्याचे
काम केल्याचे सर्वांनी पाहिले आहे. काही दिवसांपूर्वी आ. महेश लांडगे यांनी पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी
केली होती. यावर उत्तर देत खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी नवीन जिल्हा निर्मितीपेक्षा पायाभूत सुविधांवर लक्ष द्यावे,
असा टोला लगावला होता. आता कोल्हे आणि लांडगे बैलगाडा शर्यतीच्या श्रेयवादावरून समोरासमोर आले आहेत.
(BullockCart Race)
Web Title : Bullock Cart Race | status war between the supporters of mp amol kolhe
and mla landge on bullock cart race
- Chandrashekhar Bawankule | ‘2024 पर्यंत मोठे नेते भाजपात येणार, पुण्यातही होणार बदल’, बावनकुळेंचे संकेत
- Pune Crime News | पुण्याच्या शिवाजीनगर आणि कोंढवा परिसरात अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने हुक्का ओढण्यास लावल्यानंतर केलं KISS, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
- Pune Crime News | पुण्याच्या शिवाजीनगर आणि कोंढवा परिसरात अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने हुक्का ओढण्यास लावल्यानंतर केलं KISS, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
Comments are closed.