नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विमानतळांवरील शुल्क-मुक्त स्टोअरमधून आगामी काळात एकच मद्याची बाटली खरेदी करता येईल. सूत्रांनी सांगितले की, व्यापार मंत्रालयाने 1 फेब्रुवारीला सादर होणार्या आगामी अर्थसंकल्पासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना हा प्रस्ताव दिला आहे. मंत्रालयाने ड्यूटी फ्री स्टोअरमधून एक सिगरेटचे खोके खरेदी करण्याच्या सुविधेवरही बंदीचा प्रस्ताव दिला आहे. सध्या परदेशातून आलेले प्रवाशी विमानतळावरील अशा ड्यूटी फ्री स्टोअरमधून दोन मद्याच्या बाटल्या आणि एक खोके सिगारेट खरेदी करू शकतात.
एक लीटर मद्य खरेदी करण्यास मंजूरी
सूत्रांनी सांगितले की, अनेक देश आता विमानतळावर अंतरराष्ट्रीय प्रवाशांना कमाल एक लीटर मद्य खरेदी करण्याची मंजूरी देतात. आता भारतही हीच पद्धत अवलंबणार आहे. एकीकडे सरकार विना आवश्यक वस्तूंची आयात कमी करण्यासाठी विविध उपाय करत असताना व्यापार मंत्रालयाने हा प्रस्ताव ठेवला आहे. सरकारचे म्हणणे आहे की विना आवश्यक वस्तूंच्या आयातीमुळे व्यापारातील तोटा वाढतो.
50,000 रुपयांच्या सामान खरेदीवर लागत नाही आयात शुल्क
ड्यूटी फ्री दुकानातून देशात येणारे परराष्ट्रातील प्रवासी 50000 रूपयांचे सामान खरेदी करू शकतात. यावर त्यांना आयात शुल्क भरावे लागत नाही.
या वस्तूंवर वाढू शकते सीमा शुल्क
सूत्रांनी सांगितले की, व्यापार मंत्रालयाने मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात कागद, बुट-चप्पल, रबरच्या वस्तू आणि खेळणी इत्यादीवर सीमा शुल्क वाढविण्याचाही प्रस्ताव दिला आहे. मंत्रालयाने फर्निचर, रसायन, रबऱ, कोटेड कागद आणि पेपर बोर्डसह विविध क्षेत्रातील 300 पेक्षा जास्त वस्तूंवर सीमा शुल्क आणि आयात शुल्काचे दर तर्क संगत करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
Visit : Bhaujannama.com