बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : सरकारी मोबाईल नेटवर्क कंपनी BSNL ने पुन्हा एकदा फ्री सिमकार्ड ऑफरची तारीख वाढवली आहे. त्यानंतर आता BSNL च्या फ्री सिम ऑफरचा फायदा ग्राहकांना 31 मार्चपर्यंत घेता येणार आहे. तसेच फ्री 4G सिम कार्ड ऑफरच्या एक्सटेन्शनशिवाय BSNL आपल्या ग्राहकांसाठी कॉल फॉरवर्डिंग सेवाही अगदी फ्री देत आहे.
BSNL ची ही ऑफर यापूर्वी फक्त 31 जानेवारीपर्यंतच मर्यादित होती. मात्र, आता याच सेवेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. इतर मोबाईल नेटवर्क कंपन्यांना टक्कर देण्यासाठी BSNL कडून ही सेवा दिली जात आहे. तसेच कंपनीने दोन प्लॅनमध्येही बदल केला आहे.
असा घ्या फ्री सिमचा फायदा…’
BSNL सर्वसाधारणपणे 4G सिमसाठी 20 रुपये चार्ज आकारते. मात्र, या ऑफरनुसार BSNL च्या सर्व 2G-3G ग्राहकांसाठी फ्रीमध्ये 31 मार्च, 2021 पर्यंत 4G सिमकार्ड दिले जात आहे. ही सेवा नव्या आणि जुन्या MNP युजर्ससाठी उपलब्ध आहे. नवीन आणि जुन्या ग्राहकांना या सेवेचा लाभ घेण्यासाठी किमान 100 रुपयांचा रिचार्ज (FRC) करावा लागणार आहे.
फ्री कॉल फॉरवर्डिंग :
BSNL ने चेन्नई आणि तमिळनाडू सर्कलमध्ये ही सुविधा मोफत दिली आहे. त्यामुळे आता बीएसएनएलच्या ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय कॉल फॉरवर्डिंग सेवेचा लाभ घेता येणार आहे.
फक्त केरळ सर्कलसाठीच ही ऑफर
दरम्यान, BSNL च्या सुविधेचा लाभ फक्त केरळ सर्कलमधील ग्राहकांनाच घेता येणार आहे. त्या बाहेरील ग्राहकांसाठी ही ऑफर लागू नसेल, असेही कंपनीकडून सांगण्यात आले.