बहुजननामा ऑनलाइन टीम : पतीचा पत्नीवर अवैध संबंध असल्याचा संशय होता ज्यामुळे त्यांच्यात वारंवार भांडण होते. जेव्हा एक दिवस पती दारू पिऊन आला, तेव्हा पत्नीने पतीचे डोके बेडला आपटून त्याची हत्या केली, त्यानंतर पत्नीने पतीचा मृतदेह तीन दिवस तिच्या पलंगात लपून ठेवला, परंतु नंतर मृतदेह लपविण्यासाठी प्रयत्न करीत असताना ती पकडली गेली. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात ही खळबळजनक घटना घडली आहे.
अलवार जिल्ह्यातील फुलबाग पोलीस स्टेशन अंतर्गत खिजुरीवास गावातील कुलदीप यादव हा गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचे अर्धवट शरीर पोलिसांना मिळाल्यानंतर हा प्रकार समोर आला. पोलिसांनी तपास केल्यानंतर त्याच्या पत्नीनेच त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी कुलदीपची पत्नी निशा यादवला ताब्यात घेतले आहे.
पतीबरोबर भांडण झाल्यानंतर तिने कुलदीपचे डोके बेडच्या खालच्या बाजूला आदळून त्याची हत्या केली , त्यानंतर त्याचा मृतदेह बेडमध्ये लपून ठेवला, २ दिवस तो मृतदेह बेडमध्ये सडल्याने ३ऱ्या दिवशी मृतदेहाचा वास सुटल्याने घरच्यांनी विचारल्यावर उंदीर मेला असे सांगितले , त्यानंतर तिने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो जाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा जळण्याचा वास आल्यानंतर घरच्या लोकांनी पाणी टाकून आग विझवली. त्यानंतर ह्या प्रकरणाचा खुलासा झाला आणि निशाला अटक करण्यात आली आहे.
Visit : bahujannama.com