बहुजननामा ऑनलाइन टीम – लहान बाळांसाठी आईचं दूध (Breastfeeding Mother Diet) अत्यंत पौष्टिक आहार मानला जातो. लहान बाळाला आईचे दूध हे अत्यंत गरजेचं असतं. तज्ञांच्या मते, बाळाच्या जन्मापासून ते सहा महिन्यांपर्यंत त्याला फक्त आईचे दूध (Mothers Milk) द्यावं लागतं. मात्र यासाठी आईने सकस आहार (Healthy Diet) घेणं अगदी महत्वाचं आहे (Breastfeeding Mother Diet).
आईच्या दुधात ऊर्जा आणि पोषक तत्त्वांचा उत्तम स्त्रोत असतो. तसेच नुकतंच आई झालेल्या महिलांसाठी स्तनपान (Breastfeeding) अत्यंत फायदेशीर मानले जाते. तर बऱ्याचदा स्तनपान देणाऱ्या महिलांच्या मनात प्रश्न असतो की, त्यांनी कोणत्या आहाराचे सेवन करावे (Breastfeeding Diet) ? तसेच कोण कोणते फळ खावे (Fruits For Breastfeeding Mother)? जाणून घेऊयात स्तनपान देणाऱ्या महिलांना कोणते फळे चांगले असतात (Breastfeed Mothers This Fruits Should Include In Diet).
हिरवी पपई (Green Papaya) –
ज्या महिला स्तनपान देत असतात, त्यांनी सर्वप्रथम हिरव्या रंगाच्या पपईवर अधिक भर दिला पाहिजे. पपईमध्ये गॅलेक्टागॉग (Galactagogue) असतं. हा स्तनांमध्ये दूध उत्पादनासाठी उपयुक्त मानलं जातं. पपई खाल्ल्याने डिहायड्रेशनची (Dehydration) समस्या दूर होते. त्यामुळं ही पपई स्तनपानासाठी उपयुक्त मानली जाते.
चिकू (Sapodilla) –
स्तनपान देणाऱ्या महिलांनी चिकूचे सेवन नक्कीच करावं. चिकूमध्ये अति कॅलरी (Calories) असते, जी स्तनपान देणाऱ्या महिलेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. चिकूद्वारे स्तनपान दरम्यान बर्न होणाऱ्या कॅलरीज तुम्ही पुन्हा वाढवू शकतात.
अंजीर (Fig) –
अंजीर हे असे फळ आहे, जे माणसाच्या शरीराला अनेक आजारापासून दूर ठेवतं.
अंजीरमध्ये मॅग्नेशियम (Magnesium), कॉपर (Copper), कॅल्शियम (Calcium) आणि आयर्न (Iron) असे अनेक पोषक घटक आहेत. अंजीरचे सेवन आई आणि मूल या दोघांसाठी अत्यंत फायदेशीर असते.
फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Breastfeeding Mother Diet | breastfeed mothers this fruits should include diet
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
Malaria | फुफ्फुस-लिव्हर वाईट प्रकारे डॅमेज करू शकतो मलेरिया, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव