कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – Kolhapur News | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे कोल्हापूर (Kolhapur News) दौऱ्यावर होते. त्यादरम्यान आव्हा़ड यांना वाहतूककोंडीचा अनुभव आला. आव्हाड यांच्या गाड्यांचा ताफा जात होता. ताफ्याला वाट करून देताना मात्र एका पोलिसाने (Police) वाहनचालकाला कानशिलात लगावली असल्याची घटना घडली. वाहनचालकावर हात उगारल्याचा व्हिडीओ (Video) आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या गाड्यांचा ताफा कोल्हापूरातील एका चौकातून अंबाबाईच्या दर्शनाला जात होता. त्यावेळी त्याठिकाणी वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, वाहनांमधून वाट काढताना पोलिसांची मात्र धावपळ दिसून येत आहे. अशातच ताफ्याच्या पुढे असलेल्या एका चारचाकी वाहनाला (Jeep) बाजूला करताना एका पोलिसाने पळत येऊन वाहनचालकाच्या कानशिलात लगावली आहे. (Kolhapur News)
दरम्यान, हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर देखील चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान या घटनेमुळे पोलिस अरेरावी करत असल्याचे सवाल परिसरातून उपस्थित होत आहे.
Web Title : Kolhapur News | jitendra awhad car stuck in traffic kolhapur police slaps other car driver video goes viral social media
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
Malaria | फुफ्फुस-लिव्हर वाईट प्रकारे डॅमेज करू शकतो मलेरिया, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव
Indian Railways | प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! आज रेल्वेच्या तब्बल 372 गाड्या रद्द; जाणून घ्या
‘हा’ नंबर डायल करताच हॅक होईल WhatsApp अकाऊंट, कधीही करू नका ‘या’ चूका