बहुजननामा ऑनलाइन टीम – नोकरी शोधत असलेल्या दहावी, बारावी आणि पदवीधर तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय पशुसंवर्धन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने विविध पदांवर भरती काढली आहे. त्याअंतर्गत पशुसंवर्धन महामंडळ सेल्स असिस्टंट, सेल्स डेव्हलपमेन्ट अधिकारी व सेल्स मॅनेजर या पदांवर नियुक्ती करेल. अशा परिस्थितीत, या पदासाठी अर्ज करू इच्छित सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना www.bharatiyapashupalan.com या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. सूचना पूर्ण वाचल्यानंतर येथे अर्ज करा. अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी फॉर्ममध्ये कोणताही गोंधळ होऊ नये, हे लक्षात ठेवले पाहिजे. असे झाल्यास फॉर्म नाकारला जाईल.
पदांचा तपशील
एकूण ३३४८ पदे
सेल्स असिस्टंट- २७०० पदे
सेल्स डेव्हलपमेंट अधिकारी- ५४० पदे
सेल्स मॅनेजर- १०८ पदे
शैक्षणिक पात्रता
सेल्स असिस्टंट पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. या व्यतिरिक्त सेल्स डेव्हलपमेंट अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण असावे आणि सेल्स मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असावे.
वयोमर्यादा
सेल्स असिस्टंटसह इतर पदांसाठी वयाची पात्रता वेगवेगळी निश्चित केली गेली आहे. त्यानुसार सेल्स मॅनेजरचे वय २५ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असावे. त्याचबरोबर सेल्स डेव्हलपमेंट अधिकारी व सेल्स असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ४० वर्षे असावे.
वेतन
सेल्स असिस्टंट- १५,०००
सेल्स डेव्हलपमेंट अधिकारी- १८,०००
सेल्स मॅनेजर- २१,०००
निवड प्रक्रिया
सेल्स मॅनेजरसह इतर सर्व पदांच्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीतून केली जाईल.