नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक बाप आणि मुलगा एअरपोर्टवर बसून दारू पीत होते. त्यांना फ्लाईटची अनाऊंसमेंटच ऐकू आली नाही. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा स्वत: गेट खोलून हातात सुटकेस घेऊन ते रनवेवर धावू लागले. यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. हे प्रकरण इटलीतील कागलिअरी एअरपोर्टवरील आहे. दोघेही ब्रिटीश नागरिक असून ते लंडनला जाणार होते.
पोलिसांनी सांगितले की, हेच जर दुसऱ्या ठिकाणी घडलं असतं तर त्यांच्यावर गोळी झाडली गेली असती. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, बोर्डिंग गेटवर उशीरा पोहोचल्याने यांना एंट्री मिळाली नाही म्हणून त्यांनी इमरजंसी गेट उघडलं. एका इंग्रजी वृत्तानुसार, 65 वर्षीय एन्टोनिनो लोई आणि 40 वर्षीय त्यांचा मुलगा डीजे टोनी लोई यांना एकूण तब्बल 3.4 लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. दोघेही easyjetच्या फ्लाईटने उड्डाण करणार होते. easyjetनेही या घटनेची पु्ष्टी केली आहे.
आपल्याशी वाईट वर्तन केल्याचं सांगत टोनी लोईने दंडाला आव्हान देण्याचं बोललं आहे. साधारणपणे पहिल्या मजल्यावरील गेटमधून बोर्डिंग होत होती, परंतु यावेळी त्यांनी खाली असणाऱ्या गेटने बोर्डिंग केली. पोलिसांना येताना पाहून त्यांना वाटलं की, रेडिओवर फ्लाईट थांबवण्यास सांगतील आणि अपवादात्मक परिस्थिती म्हणत एंट्री मिळवतील. एन्टोनिनोनं म्हटलं की, त्यांना फक्त फ्लाईट पकडायची होती. ते कोणी क्रिमिनल नाहीत. त्यांनी नशेत असल्याचंही नाकारलं. परंतु एअरपोर्ट पोलीस अधिकारी मिम्मो बारी म्हणाले, “दोघेही बारमध्ये दारू पित होते आणि त्यांनी अनाऊंसमेंट मिस केली.
Visit : Bahujannama.com