बहुजननामा ऑनलाईन – पूजा भट्ट (Pooja Bhatt) स्टारर बॉम्बे बेगम्स (Bombay Begums) ही वेब सीरिज सध्या वादात सापडल्याचं दिसत आहे. मुलांचं अयोग्य पद्धतीनं चित्रीकरण केल्याचा आरोप या सीरिजवर आहे. त्यामुळं बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोग (NCPCR) नं या वेब सीरिजच्या स्ट्रीमिंगवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. बॉम्बे बेगम्स सीरिजमधील काही सीन्समुळं ट्विटरवर खूप वाद सुरू आहे. काही सीन्सवर प्रेक्षकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.
या सीन्समुळं सुरू आहे वाद
बॉम्बे बेगम्स सीरिजमधील काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत. यात शाळेतील मुली दाखवण्यात आल्या आहेत. अॅक्ट्रेस आध्या आनंदचे हे सीन्स आहेत. आध्यानं पूजा भटनं साकारलेल्या राणी नावाच्या पात्राच्या सावत्र मुलीची भूमिका साकारली आहे. शाय असं तिच्या भूमिकेचं नाव आहे.
सीन्स बद्दल बोलायचं झालं तर 13 वर्षांची शाय शाळेत जाते. जिथं ती मुलींना आपल्या शरीराबद्दल बोलताना आणि फोटो काढताना पाहते. यानंतर शाय राण्यांच्या शरीराबद्दल बोलते आणि पेपरवर एक चित्र काढते. हा सीन खूप व्हायरल होताना दिसत आहे. यावरच लोकांनी आक्षेप घेतला आहे.
व्हायरल होणाऱ्या सीन्सच्या यादीत आणखी एक सीन आहे. यात शाय (आध्या आनंद) व प्लाबिता बोरठाकुर (Plabita Borthakur) च्या भूमिकेपासून स्मोक करताना दाखवलं गेलं आहे. आणखी एका सीनमध्ये शाय पार्टीत दारू पिल्यानंतर ड्रग्ज घेताना दिसत आहे. या सीनचे देखील स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया युजर्स याला चुकीचं असल्याचं सांगत आहे.
NCPCR ची नेटफ्लिक्सला नोटीस
NCPCR नं नेटफ्लिक्सला नोटीस पाठवली आहे. यात म्हटलं आहे की, नेटफ्लिक्सनं मुलांशी संबंधित किंवा मुलांसाठी असणारी कोणतीही सामग्री स्ट्रीम करताना अतिरीक्त काळजी घ्यायला हवी. तु्हाला हे प्रकरण पाहण्यासाठी आदेश दिला जात आहे. ताबडतोब या सीरिजच्या स्ट्रीमिंगवर बंदी घातली जावी. 24 तासाच्या आत एक विस्तृत रिपोर्ट सादर केला जावा. जर असं झालं नाही तर आयोगाला सीपीसीआर अधिनियम, 2005 मधील कलम 14 मधील तरतुदीनुसार योग्य कारवाईसाठी अॅक्शन घ्यावी लागेल.
बॉम्बे बेगम्स या वेब सीरिजमध्ये नेमकं काय ?
बॉम्बे बेगम्स या वेब सीरिजबद्दल बोलायचं झालं तर ही सीरिज 8 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. या वेब सीरिजमध्ये 5 महिलांची स्टोरी आहे ज्या वेगळ्या वर्गातील आणि वयाच्या आहेत. यात 13 वर्षीय शाळेत शिकणाऱ्या मुलीपासून तर 49 वर्षीय बँकेच्या सीईओ पर्यंत दाखवण्यात आल्या आहेत. सीरिजमध्ये वर्कप्लेसमध्ये होणाऱ्या शोषणाचे संवेदनशील मुद्दे, समलैंगिक संबंध, प्रतारणा, लिव इन रिलेशनशिप, लैंगिक शोषण, प्रेग्नंसी, मेनोपॉज सहित इतर अनेक मुद्दे दाखवण्यात आले आहेत. अलंकृता श्रीवास्तव यांनी सीरिजचं डायरेक्शन केलं आहे.