बहुजननामा ऑनलाईन टीम – बॉलिवूड सिंगर कनिका कपूर (Kanika Kapoor) अशी पहिली सेलेब्स आहे जी कोरोनाची शिकार झाली होती. कनिकाला कोरोना झाल्यानंतर खूप गोंधळ झाला होता. कोरोनातून बरी झाल्यानंतर अनेक महिन्यांनी तिनं तिचा अनुभव शेअर केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तिनं सांगितलं की, असं होणं म्हणजे तिच्या कुटुंबीयांसाठी आणि लंडनमध्ये असणाऱ्या मुलांसाठी मोठा धक्का होता.
कुटुंबीयांना यायचे धमकीचे फोन आणि मेसेज
मुलाखतीत बोलताना कनिका म्हणाली, आपल्या कुटुंबाला आणि मुलांना ती 4 महिने पाहू शकली नाही. तिच्या कुटुंबीयांना धमकीचे फोन आणि मेसेज येत होते. यातील काही तर तिला मारण्याची भाषाही करत होते.
‘…त्यामुळं मी घाबरले होते’
कनिका कपूर पुढं म्हणाली की, मी खूप मजबूत आहे. परंतु मी माझ्या आजूबाजूला जे काही पाहिलं त्यामुळं मी घाबरले होते. चुकीच्या कथांनी मला खूप दुखावलं.
उशीरा प्रतिक्रिया देण्याचं सांगितलं कारण
कनिका म्हणाली, मी दीर्घकाळ काही प्रतिक्रिया दिली नाही. कारण मला नव्हत माहित की, काय प्रतिक्रिया देऊ. लोकांच्या वार्ता ऐकून वाटत होतं की, कोणी माझं ऐकणार नाही.