Video : ट्रेनिंग सेशनमधून लीक झाला टायगर श्रॉफचा चकित करणारा व्हिडीओ ! यापूर्वी कधीच नसेल पाहिला ‘असा’ स्टंट

December 12, 2020

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आज बॉलिवूडमधील फेमस ॲक्शन हिरो म्हणून ओळखला जातो. त्याची फायटींग आणि ॲक्शन चाहत्यांमध्ये खूप फेमस आहे. ॲक्टींग सोबतच तो आपल्या ॲक्शनसाठी आणि फिटनेससाठीही ओळखला जातो. इतकंच नाही तर पडद्यावरील त्याचे अनेक स्टंट हे खरे असतात. टायगर हा मार्शल आर्टमध्ये तरबेज आहे. नुकताच त्याच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात तो जबरदस्त स्टंट करताना दिसत आहे. त्याच्या ट्रेनिंग वर्कआऊटमधील प्रॅक्टीस सेशनचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. चाहते तर त्याचा असा स्टंट पाहून अवाक् झाले आहेत.

टायगरनं त्याच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो जबरदस्त स्टंट करताना दिसत आहे. त्याच्या मागे तेही 10 फूट एवढ्या उंचीवर असणाऱ्या टारगेटवर तो किक मारताना दिसत आहे, तेदेखील बॅक फ्लिप मारत.

सध्या टायगरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर काही जण त्याची तुलना आता अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) सोबत करत आहेत. काहींमध्ये तर अशीही चर्चा सुरू झाली आहे की, बेस्ट ॲक्शन हिरो कोण आहे.

टायगरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो बागी 3 मध्ये दिसला आहे. टायगर हॉलिवूड सिनेमा रैम्बोच्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे. टायगर 2014 साली आलेल्या हिरोपंती या सिनेमाच्या सिक्वलमध्ये म्हणजेच हिरोपंती 2 मध्येदेखील काम करताना दिसणार आहे.