नवी दिल्ली :वृत्तसंस्था – Boiled Eggs Side Effect | आरोग्याचे अनेक फायदे देणारे बॉईल अंड्याचे काही साईड इफेक्ट सुद्धा असतात. Women’s Health ने काही दिवसांपूर्वीच उकडलेल्या अंड्याच्या डाएटवर एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टनुसार, बॉइल एग लीन प्रोटीन (मासे आणि चिकन), विना स्टार्चच्या भाज्या (पालेभाज्या, ब्रोकली, सिमला मिरची, शतावरी आणि गाजर) काही निवडक फळे (बेरीज, लिंबू, टरबूज) कमी फॅटच्या वस्तूंचा यादीत (Boiled Eggs Side Effect) समावेश आहे.
डायटिशियन आणि न्यूट्रशनिस्ट एरिन पलिन्स्की वेड नुसार, ब्रेकफास्टमध्ये लोक नेहमी उकडलेल अंडी फळांसोबत खातात. तर लंच आणि डिनरमध्ये ती काही भाज्यांसोबत किंवा लीन प्रोटीनसोबत खातात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उकडलेल्या अंड्याच्या आहारामुळे सर्वात मोठा त्रास हा आहे की, यावर अवलंबून राहिल्याने आपल्या शरीराला ती अनेक पोषकतत्व मिळत नाही ज्यांची गरज असते.
डायटीशियन आणि न्यूट्रिशनिस्ट केरी यांच्या अहवालात खाण्याच्या अशा अनेक वस्तू सांगितल्या आहेत ज्या उकडलेल्या अंड्यामुळे आपल्या डाएटमधून बाहेर होतात. उकडलेल्या अंड्याच्या डाएटमुळे प्रोसेस्ड फूड, बटाटा, मका, मटर आणि शेंगा आहारातून बाहेर पडतात.
उकडलेल्या अंड्याचा डाएट फॉलो करणार्यांना केळे, अननस, आंबा, ड्राय फ्रूट्स आणि गोड पेय पदार्थ टाळण्यास सांगितले जाते. असे करणे आरोग्यासाठी का योग्य नाही? ते एका नवीन स्टडीत सांगितलेल्या उदाहरणावरून समजून घेता येईल. यात म्हटले आहे की कार्डियोव्हस्क्यूलर हेल्थसाठी धान्य खाणे आवश्यक
आहे आणि ते वजन कमी करण्यात सुद्धा उपयोगी आहे.
दोन उकडलेल्या अंड्यांना एक चांगला नाश्ता मानले जाते, परंतु ती दिवसभर खाणे चांगले नाही. अंड्यात लाभदायक पोषकतत्त्वासह कॉलेस्ट्रोल आणि सॅच्युरेटेड फॅटसुद्धा असते जे लिव्हर आणि हृदयासाठी घातक आहे. आठवड्यात दोन अंडी दोन ते तीनवेळा खात असाल तर चिंतेचे कारण नाही.
web title : Boiled eggs one side effect can increase your health concerns.
ITR दाखल करताना करू नका ‘या’ 6 चूका, याच महिन्यात भरायचाय इन्कम टॅक्स रिटर्न, चूक पडू शकते महागात
WhatsApp मध्ये येणार ‘हे’ 6 धमाकेदार फीचर्स, बदलून जाईल वापरण्याची स्टाईल; जाणून घ्या