बहुजननामा ऑनलाइन टीम – महापालिकेच्या नगररचना कार्यालयातील आवेक्षक राजकुमार मेश्राम यांचा शहरातील बोगस लेआऊट प्रकरणी शोध घेतला जात आहे. मेश्राम जुळे सोलापूरातील(Bogus layout case) एक सोसायटीत राहायला होते. परंतु त्यांच्या घराला टाळं दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी त्यांच्या सोसायटीमधील अनेक सदस्यांशी चर्चा करून मेश्राम यांचा माग काढण्याचा प्रयत्न देखील केला.
सोरेगाव आणि दहिटणे या ठिकाणी बोगस लेआऊटची प्रकरणं उघडकीस आली आहेत. मनपा अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, शहरात अशी अनेक प्रकरणं आहेत. बांधकामात व्यवसायात गैरप्रकार करणाऱ्या लोकांनी मनपाचे आवेक्षक राजकुमार मेश्राम यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्रकार केल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तसे जबाबही त्यांनी पोलिसांना दिले आहेत. यावर मेश्राम यांच्याकडून खुलासा आलेला नाही.
मेश्राम बऱ्याच दिवसांपासून गायब आहेत. मेश्राम जुळे सोलापूरात आयएमएस स्कूल परिसरातील एका सोसायटीत राहतात. परंतु घराला मात्र टाळं आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांशी चर्चा केली,. मेश्राम कुठं असतील, अलीकडच्या दिवसात कोणाशी बोलणं झालं होतं का याची माहिती जाणून घेतल्याचं रहिवाशांकडून सांगण्यात आलं आहे.
सरलगरवस्ती येथील प्रकरणाकडे लक्ष
सध्या पोलीस सलगरवस्ती येथील बोगस लेआऊट प्रकरणाचा तपास करत आहेत. बोगस नकाशाच्या आधारे खरेदी विक्री करण्यात आली आहे. हे नकाशे कोणाकडून
प्राप्त झाले याचा शोध घेतला जात असल्याचं मनाप अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांना आवश्यक असलेली कागदपत्रे नगररचना कार्यालयाकडून तात्काळ उपलब्ध करून दिली आहेत. या प्रकरणात केव्हा गुन्हा दाखल होईल याकडं आता साऱ्यांचं लक्ष आहे.