बारामती : बहुजननामा ऑनलाइन – सध्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होत आहे. भाजप मध्ये मोठया प्रमाणावर इनकमिंग सुरु आहे. परंतु महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादि मध्ये देखील इनकमिंग होत आहे. भाजप पक्षाच्या इंदापूर च्या नेत्या डॉ. अर्चना पाटील यांनी आज राष्ट्रवादी मध्ये प्रवेश घेतला. यावेळी बारामती मध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी चे इनकमिंग सुरु झाल्याचे म्हणता येईल.
अर्चना पाटील या एमबीबीएस रेडिओलॉजिस्ट आहेत. त्यांच्या घराण्याचा राजकीय इतिहास आणि तालुक्यात संपर्क मोठा आहे. त्यांचे आजोबा दिनकर पाटील यांनी इंदापूर मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली आहे. अवघ्या काही मोजक्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. अर्चना या राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र सचिव म्हणून कार्यरत होत्या.
अर्चना पाटील ह्यांच्या रूपाने एक तरुण, अनुभवी आणि सुशिक्षित चेहरा मिळाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या आउटगोइंग मध्ये हे इनकमिंग दिलासा देणार ठरणार आहे.