BJP MLA Ashish Shelar | ‘महाराष्ट्र उबाठाला थेट विचारतोय…काँग्रेस की हिंदुत्व?, औरंगजेब की सावरकर?’, आशिष शेलारांचे टीकास्त्र

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) आणि ठाकरे गटाचे नेते हे सतत शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) आणि भाजपवर (BJP) टीका करत आहेत. विविध मुद्यांवरुन निशाणा साधत आहेत. याच दरम्यान भाजप आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ‘महाराष्ट्र आता रस्त्यावर होर्डिंग लाऊन उबाठाला थेट विचारतोय…काँग्रेस (Congress) की हिंदुत्व?, औरंगजेब की सावरकर?’ असं म्हणत शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी ठाकरे गटावर (Thackeray Group) हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र आता रस्त्यावर होर्डिंग लाऊन उबाठाला थेट विचारतोय…
◆ औरंगाबाद की छत्रपती संभाजी महाराज नगर?
◆ उस्मानाबाद की धाराशिव?
◆ अहमदनगर की पुण्यश्लोक
अहिल्यानगर?
◆ काँग्रेस की हिंदुत्व?
◆ कबर की स्मारक?
आणि
◆ औरंगजेब की सावरकर?
म्हणून
शब्दांची कोटी न करता..
मर्द,…— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 23, 2023
आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन यासंदर्भात ट्विट केलं आहे. ‘महाराष्ट्र आता रस्त्यावर होर्डिंग लाऊन उबाठाला थेट विचारतोय…
औरंगाबाद की छत्रपती संभाजी महाराज नगर?
उस्मानाबाद की धाराशिव?
अहमदनगर की पुण्यश्लोक अहिल्यानगर?
काँग्रेस की हिंदुत्व?
कबर की स्मारक? आणि
औरंगजेब की सावरकर? म्हणून शब्दांची कोटी न करता..मर्द, खंजीर…असले शब्द न वापरता…उबाठा प्रमुखांनी महाराष्ट्राला स्पष्ट शब्दात सांगावे…यापैकी नेमके काय? की दोन्ही? नाही तर लहानपणीचा खेळ…एवढं एवढं पाणी आणि गोलगोल “गाणी” असं शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
1 जुलैला विराट मोर्चा
महापालिका असताना लोकप्रतिनिधी असतात. स्थायी समितीत चर्चा होते त्यानंतर कामे दिली जातात.
मात्र रस्त्याच्या नावाने, जी-20 (G-20) नावाने सध्या वारेमाप उधळपट्टी सुरु आहे.
मुंबईला सध्या मायबाप राहिले नाही. लुटालूट सुरु आहे.
या महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी जाब विचारण्यासाठी येत्या 1 जुलै रोजी शिवसेना
महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)
करतील अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
Web Title : BJP MLA Ashish Shelar | bjp ashish shelar slams uddhav thackeray over so many issues in maharashtra
- Mumbai Police – Pune Crime News | मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन, मुंबई, पुणे बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी; पोलिसांना आलेल्या कॉलने खळबळ
- Service Through Ration Shops | रेशन दुकानांमध्ये नागरी सेवा, बँकिंग सुविधांसह ‘या’ सर्व गोष्टीही उपलब्ध होणार
- Pune Police News | पुण्यातील 11 महिला पोलिसांची वरिष्ठ निरीक्षकाविरूध्द पोलिस आयुक्तांकडे तक्रार; मोठ्या अडचणींना व मानसिक त्रासाला तोंड देत…
Comments are closed.