जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – मेगा भरती ही भाजपाची मेगा चूक होती, असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावरून विरोधकांनी भाजपाला एकीकडे घेरले असताना दुसरीकडे पक्षातूनही घरचा आहेर देण्यात येत आहे. पाटील यांच्या या वक्ताव्याचा आधार घेत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही राज्यातील पक्षनेतृत्वाला खडेबोल सुनावले आहेत. मेगा भरतीमुळेच माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना फटका बसला, शिवाय भाजपने सरकार घालवले, असे खडसे यांनी म्हटले आहे. जळगावातील त्यांच्या मुक्ताई निवास्थानी ते पत्रकरांशी बोलत होते.
खडसे म्हणाले, भाजपने लोकसभा निवडणुकीच्या काळात मेगा भरतीला सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीच्या काळात या मेगा भरतीला जोर चढला होता. भाजपने मेगा भरतीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भाजपात घेतले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्यांवर आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यांच्या विरोधात सतत दंड थोपटले, अशा नेत्यांनाच मेगा भरतीतून पक्षात घेण्यात आले.
खडसे पुढे म्हणाले की, भाजपा राज्य नेतृत्त्वाने पक्षातीलच ज्येष्ठ नेत्यांचे ऐकले नाही. मेगा भरतीमुळे भाजपला विधानसभा निवडणुकीत 220 पेक्षा जास्त जागा सहज मिळतील, असे पक्षश्रेष्ठींना वाटत होते. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना निर्णय प्रक्रियेत डावलले काय आणि त्यांना तिकीट नाकारले काय? काहीच फरक पडत नाही, असे पक्षश्रेष्ठींनी वाटत होते. त्यानंतर मेगा भरतीतून आयात नेत्यांना तिकिटांची खैरात वाटली. परंतु, याचा परिणाम उलटाच झाला. ज्यांना भाजपने तिकिटे वाटली त्यांना जनतेने साफ नाकारले.
मेगा भरतीचा फटका पक्षासह माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनाही बसला. सध्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये भाजपाच्या मेगा भरतीचे मूळ आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खरे बोलण्याची हिंमत दाखविल्याने मी त्यांचे अभिनदंन करतो. त्यामुळे आता पक्षनिती बदलेल व सुधारणा होईल, असे खडसे म्हणाले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि उदयनराजे भोसले यांच्यातील वादाबाबत खडेसे यांना विचारले असता ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडून पुरावे मागणे चुकीचे आहे, हा मूर्खपणा आहे. राऊत यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे होते.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा