मोसुल : वृत्तसंस्था – इराकच्या मोसुलमध्ये आयएसआयएसच्या दहशतवाद्याला पकडण्यासाठी गेलेल्या स्वाट टीमने जेव्हा त्याला घरात पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. या दहशतवाद्याला पोलिसांना पाहून हालताही येत नव्हते. कारण त्याचे वजन तब्बल 250 किलो होते. जेव्हा त्याला अटक करण्यात आली तेव्हा घेऊन जाण्यासाठी पिकअप ट्रकची मदत घ्यावी लागली. पिकअप ट्रकने दहशतवाद्याला पोलीस घेऊन जात असतानाचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. या दहशतवाद्याला ओबेसिटीची समस्या आहे.
आयएसआयएस दहशतवादी शिफ अल निमा जो अबु अब्दुल बारी या नावाने ओळखला जातो, त्याला इराकच्या स्वाट टीमने पश्चिम इराकमध्ये अटक केली. आयएसआयएस दहशतवाद्यांमध्ये जब्बा द जिहादी या नावाने प्रसिद्ध असलेला हा दहशतवादी सुरक्षा दलांच्याविरोधात भडकाऊ भाषणे देण्यासाठी प्रसिद्ध होता. त्याला आयएसआयएसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जाते.
तपास अधिकार्यांनी सांगितले की, अबु अब्दुल बारीने फतवा काढून आयएसआयएस वर निष्ठा ठेवण्यास नकार देणार्या विचारवंताना आणि मौलवींना फाशी देण्याचे आदेश दिले होते. सुरक्षा दलांचे म्हणणे आहे की, दहशतवादी अबु बारीने शहरातील एक मशिद स्फोटाने उडवून देण्याचा फतवा जारी केला होता. ही मशिद 2014 मध्ये आयएसआयएसने पूर्णपणे नष्ट केली होती आणि मोसुलवर कब्जा केला होता.
दहशतवादी अबु अब्दुल बारीचा फोटो शेयर करून लंडनच्या थिंक टँक क्यूलिआमचे संस्थापक माजिद नवाज यांनी लिहिले आहे की, तो खुप वजनदार होता आणि पोलीस व्हॅनमध्ये बसू शकत नव्हता. त्याच्या वजनामुळे पोलिसांना त्याला पिकअप ट्रकमध्ये टाकून घेऊन जावे लागले. लोकांना गुलाम करणारा, बलात्कार करणारा, यातना देणारा, नरसंहार करणारा आयएसआयएसचा हा दहशतवादी स्वत: त्याच्या दोन पायांवर उभा राहू शकत नाही.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा