अमरावती : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादी परिवर्तन निर्धार यात्रेच्या निमित्ताने येथील नेहरू मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोलताना छगन भुजबळ यांनी भाजप वर आरोप केले. निवडणुकीच्या पूर्वी भाजप देशात जातीय दंगली घडवून आणण्याची शक्यता आहे. सरकारजवळ विकासाची कामे सांगण्यासाठी काहीच नाही, त्यामुळे आता धार्मिक विषयांचा आधार घेतला जात आहे. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दुही पसरवण्याचे काम केले जात आहे. देशात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. गोहत्याबंदीच्या विषयावरून मने कलुषित केली जात आहेत. भारतीय राज्यघटनेलाच धक्का लावण्याचे काम केले जात आहे. सरकारमधील काही लोक हिंदू देवतांच्या जाती शोधायला निघाले आहेत.
भारतीय राज्यघटनेलाच धक्का लावण्याचे काम केले जात आहे. सरकारमधील काही लोक हिंदू देवतांच्या जाती शोधायला निघाले आहेत. त्यांना त्या शोधण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, याकरिता या सत्ताधाऱ्यांना घरी पाठवायला हवे. त्यांना मंदिर बनवायचे नाही, केवळ लोकांना वेडे बनवायचे आहे. महागाईचे उदाहरण देताना त्यांनी पेट्रोलच्या दराची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयाशी केली. काही दिवसांमध्ये हे दर लालकृष्ण अडवाणी यांच्या वयाच्या पलीकडे जातील.
आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांना न्यायालयाने फटकारले
भाजपला नावे बदलण्याची आवड आहे, कदाचित पेट्रोलचे नाव पंडित दीनदयाल उपाध्याय बहुमूल्य तरल पदार्थ ठेवले जाईल, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.काँग्रेसच्या ६५ वर्षांच्या सत्ताकाळात देशावर ५१ लाख कोटींचे कर्ज झाले होते. पण, या सरकारच्या चार वर्षांच्या काळात आणखी ३१ लाख कोटी रुपये कर्ज झाले. जे आजवर झाले नाही, ते यांनी चार वर्षांत केले. या सरकारने देश विकायला काढला आहे.असे छगन भुजबळ यांनी भाजपवर टिका केली.