बहुजननामा ऑनलाईन टीम – १४ सार्वजनिक बँकांच्या एका संघाने शुक्रवारी बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली मुंबईतील स्थित डिफॉल्टर फ्रॉटल इंटरनेशनल लिमिटेडकडून सुमारे 6,635.2.२5 कोटी रुपयांचे कर्ज वसूल करण्याची प्रक्रिया सुरु केली. या डिफॉल्टला अलीकडील बँक डिफॉल्ट पैकी सगळ्यात मोठा डिफॉल्ट म्हणून सांगण्यात येत आहे. या डिफॉल्टची तुलना फरार हिरा व्यापारी नीरव मोदी, मेहुल चोकसी आणि स्टर्लिंग बायलिंग ग्रुपशी केली जात आहे. ज्यांनी बँकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन त्याची परतफेड न करताच फरार झाले.
बँक ऑफ इंडियाशिवाय बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, विजया बँक, इलाहाबाद बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचाही समावेश आहे.
यापैकी केवळ दोन बँक, बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा यांच्या अनुक्रमे 606.17 कोटी आणि 526.05 कोटी रुपयांची थकबाकी आहे. हे थकीत रक्कम फ्रॉस्ट इंटरनॅशनल या कंपनीवर आहे. आंध्रा बँकेकडे सगळ्यात कमी थकबाकी आहे, या बँकेचे 47.85 कोटी रुपयांचे कर्ज आहे. वसुली प्रक्रियामध्ये बँकांच्या कन्सोर्टियमने कंपनीवर नोटीस चिकटवून मुंबईतील काही प्रमुख भागातील अचल संपत्ती / मालमत्ता जप्त करण्याची धमकी दिली आहे.
यामध्ये ग्लोब एक्झिम प्रायव्हेट मालकीच्या अंधेरी पूर्वेतील कार पार्किंग स्लॉट असलेली चार कार्यालये आणि ओबेरॉय चेंबर्स -1 मधील 1 ते 4 दुकानांचा समावेश आहे. त्याच परिसरातील दुकान क्रमांक 101 ते 108 पर्यंतच्या दुकानांना चेतावणीही देण्यात आली आहे. बँकांने कर्ज थकबाकीदारांना 60 दिवसांचा कालावधी दिला आहे. जेणेकरुन ते वेगवेगळ्या बँकांकडून घेतलेले सर्व थकबाकी भरतील. या थकबाकीदारांना बँकेकडून घेतलेल्या रक्कमेशिवाय व्याजही भरणे बंधनकारक आहे.
Visit : bahujannama.com