नवी दिल्ली : वृत्तसंस्था- रुपयामध्ये या वर्षातील सर्वात मोठी घसरण झाल्याची मंगळवारी नोंद झाली आहे. कमकुवत आर्थिक आकडेवारी आणि शेअर बाजाराच्या घसरणीदरम्यान रुपयाने इंट्राडे व्यापारात 100 पैशांची घसरण होऊन 72.40 चा सर्वात खालचा स्तर गाठला. सकाळी व्यापारात रुपया 55 पैशांची घसरण होऊन डॉलरच्या तुलनेत 71.95 वर उघडला होता. यावर्षी देशाच्या चलनात 3.73 टक्क्यांनी घट झाली आहे. देशाच्या चलनात रुपया गेल्या 5 वर्षात डॉलरच्या तुलनेत जवळपास 20 टक्क्यांनी घटला आहे. 3 सप्टेंबर 2014 रोजी डॉलरच्या तुलनेत रुपया 60.49 वर होता. जो मंगळवारी 3 सप्टेंबर 2019 रोजी इंट्राडे व्यापारत कमी होऊन 72.40 वर आला.
‘या’ कारणांमुळे झाला कहर
1) चीनवर अमेरिकेचे नवीन शुल्क- फॉरेक्स बाजारातील व्यापारी म्हणाले की, “चीनकडून होणाऱ्या आयातीवर अमेरिकेने नवीन शुल्क लागू केल्याने चीननेही प्रत्युत्तर शुल्क लागू केल्याची घोषणा केल्याने रुपयावरील दबाव वाढला. अमेरिकेचे नवीन शुल्क रविवारपासून लागू करण्यात आले. चीनने 75 अरब डॉलरच्या अमेरिकन वस्तूंवर प्रत्युत्तर शुल्क लागू करण्याचे ठरवले आहे. चीन ज्या अमेरिकन वस्तूंवर शुल्क आकारणार आहे त्यात सोयाबीन आणि कच्च्या तेलाचा समावेश आहे.
2) 6 वर्षाचा किमान विकास दर- जून तिमाहीच्या कमकुवत विकासदराचा रुपयावर नकारात्मक प्रभाव पडला. एप्रिल ते जून या तिमाहीत देशाचा विकास दर केवळ 5 टक्के होता. ही 6 वर्षांची खालची पातळी आहे. शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर वाढीचा दर जाहीर करण्यात आला.
3) वाहनांच्या विक्रीत घट- ऑगस्टमध्ये वाहनांच्या विक्रीत घट झाल्यानेही रुपया कमकुवत झाला. वाहन क्षेत्र मोठ्या प्रमाणात मंदीचा सामना करत आहे. जुलैमध्ये कार विक्रीत 19 वर्षातील सर्वात मोठी घसरण झाली.
5 वर्षात 20 टक्क्यांनी घसरले मूल्य
देशाच्या चलनात रुपया गेल्या 5 वर्षात डॉलरच्या तुलनेत जवळपास 20 टक्क्यांनी घसरला आहे. 3 सप्टेंबर 2014 रोजी डॉलरच्या तुलनेत रुपया 60.49 वर होता. जो मंगळवारी 3 सप्टेंबर 2019 रोजी इंट्राडे व्यापारत कमी होऊन 72.40 वर आला.
देशाच्या एकूण निर्यातीत विशेष वाढ नाही
देशाच्या एकूण निर्यातीत गेल्या 5 वर्षात केवळ 6 टक्क्यांची वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये देशातील वस्तूंची निर्यात 310.5 अरब डॉलर होती. 2018-19 मध्ये ती किरकोळ वाढून 331.02 अब्ज डॉलरवर गेली.