बहुजननामा ऑनलाइन टीम – टीव्हीवरील सर्वांत फेमस शो बिग बॉस 14 (Bigg Boss) हळूहळू खूपच मजेदार होताना दिसत आहे. घरात टिकून राहण्यासाठी स्पर्धकही बाजी लावताना दिसत आहेत. शो(Bigg Boss) सुरू होऊन 5 आठवडे झाले आहेत.
आता अशी माहिती आहे की, या शोमध्ये आता वाईल्ड कार्ड एन्ट्री घेत आणखी एका स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. एका इंग्रजी वृत्तानुसार, बिग बॉस 14 मध्ये अॅक्ट्रेस सपना सप्पू (Sapna Sappu) हिचं आगमन होणार आहे.
‘पना भाभी’ म्हणून सपनाला सिने इंडस्ट्रीत ओळखलं जातं. सपना बी ग्रेड सनेमातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपल्या मादक अदांनी सर्वांना घायाळ करणारी ही सपना भाभी आता बिग बॉस 14 मध्ये एन्ट्री करताना दिसणार आहे.
सपनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर गुंडा या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तिनं या सिनेमात अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. हिंदीसोबतच तिनं गुजराती आणि भोजपुरी सिनेमातही काम केलं आहे. लक्षवेधी बाब अशी की, मेन स्ट्रीम सोबत तिनं भारतीय पॉर्न सिनेमातही काम केलं आहे. अॅडल्ट इंडस्ट्रीत तिला सपना भाभी म्हणून ओळख मिळाली. पुढं सिनेमातही तिनं तेच नाव वापरण्यास सुरुवात केली.