नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २ हजार रुपयांच्या नोटा जवळ असलेल्यांसाठी महत्वाची बातमी असून यापूर्वीही बर्याचदा सरकार २००० रुपयांच्या नोटांचे वितरण थांबवणार असल्याचे वृत्त होते. आरबीआयने आपल्या अहवालात २००० रुपयांच्या नोटांचे मुद्रण कमी करण्यात आले असून त्याचबरोबर कर्मचार्यांना २००० रुपयांच्या नोटा न देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही वृत्त आहे. या अहवालानुसार एका सरकारी बँकेने आपल्या कर्मचार्यांना लेखी आदेश देत ग्राहकांना २००० रुपयांच्या नोटा देऊ नयेत किंवा २००० रुपयांच्या नोटा एटीएममध्ये ठेवू नयेत, असे म्हटले आहे. बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बँक कर्मचार्यांना २००० रुपयांच्या नोटांचे वितरण न करण्याचे आदेश दिले आहेत.
एका वेबसाइटने दिलेल्या अहवालात मोठ्या सरकारी बँकेने आपल्या कर्मचार्यांना २००० रुपयांच्या नोटांचे वितरण न करण्याच्या सूचना दिल्या असल्याचा दावा केला आहे. वेबसाइटने एका बँकेच्या अधिकाऱ्यांना हवाला देत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीने बँकेच्या कर्मचार्यांना २००० रुपयांऐवजी अन्य नोटा देण्यास सांगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे म्हटले आहे. तसेच एटीएममध्ये २००० रुपयांच्या नोटा न भरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून ग्राहकांनी पैसे जमा केल्यास २००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील.
सरकार २००० रुपयांच्या नोटा बंद करणार असल्याचाही दावा अहवालात करण्यात आला असून बँकेने पाठवलेल्या ईमेलमध्ये लवकरच बँकेकडून अधिकृत घोषणा व आदेश देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. बँकेने २००० रुपयांच्या नोटांऐवजी १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटांचे वितरण वाढवावे. एटीएममध्येही या नोटांची संख्या वाढवायला हवी. अहवालानुसार, सर्व व्यवस्थापकांना सांगितले गेले आहे की दुसर्या सकाळपासून व्यवहारात याची अंमलबजावणी करावी.